तहानलेली खारुताई जेव्हा प्रवाशांकडे हात जोडून पाणी मागते; प्राण्यांना किती कळतं पाहा, VIDEO पाहून कराल कौतुक


तहानलेली खारुताई जेव्हा प्रवाशांकडे हात जोडून पाणी मागते; प्राण्यांना किती कळतं पाहा, VIDEO पाहून कराल कौतुक

 

कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, माणसांपासून जनावरांपर्यंत सगळेच उष्णतेने हैराण झाले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पारा ५० च्या आसपास आहे. या धोकादायक उष्णतेपासून कोणत्याही प्रकारे दिलासा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

 

अशा परिस्थितीत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. कमाल तापमानाचा फटका बसत असतानाच मुक्या पक्षी आणि प्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याने दिलासा म्हणून शक्य असेल त्या जागी पक्ष्यांना पिण्याचे पाणी एखाद्या भांड्यामध्ये ठेवावे. दरम्यान तुम्ही गाई, म्हशी, घोडे आणि इतर अनेक पाळीव प्राणी पाणी मागताना किंवा पिताना पाहिले असतील, पण तुम्ही कधी खारुताईला हुशारीने पाणी मागताना पाहिले आहे का? अशाच एका खारुताईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Advertisement

 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता, उष्णतेमुळे त्रासलेली एक खारूताई पिण्यासाठी पाणी देण्यासाठी एका व्यक्तीचा पाठलाग करते. खारूताईचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर उभं राहून बाटलीतून पाणी पीत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी एक खारुताई येऊन त्याच्याजवळ बसते आणि त्याच्याभोवती घिरट्या घालू लागते. सुरुवातीला खारुताई असे का करत आहे हे त्या व्यक्तीला समजत नाही, परंतु काही वेळाने खारुताई आपल्या दोन पायांवर उभी राहून त्या व्यक्तीला आग्रह धरू लागते. व्हिडीओमध्ये पुढे पाहिल्यास लक्षात येईल की उष्णतेमुळे त्रस्त झालेली खारुताई त्या व्यक्तीकडे पाणी मागत आहे.

 

तो माणूस बाटलीतून पाणी पीत आहे आणि प्रचंड तहानलेली खारुताई त्या माणसाला म्हणताना दिसते आहे, “भाऊ, मलाही प्यायला पाणी दे.” यानंतर, ती व्यक्ती आपल्या बाटलीतून खारुताईला पाणी देते, जी खूप गोंडस दिसते. खारुताईचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्सही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

पाहा व्हिडीओ

 

https://www.facebook.com/watch/?v=2889304341208922

 

हा व्हिडिओ लाईट ऑफ युनिव्हर्स – जैन धर्म नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक युजर्सनी व्हिडीओला लाइकही केले आहे. अनेक युजर्स व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले… अरे ती खूप क्यूट आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…माझी इच्छा आहे की ही खारुताई माझ्याकडे पाणी मागेल. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… या व्यक्तीला खूप आनंददायी अनुभव आला असेल, त्याने किती सुंदर काम केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!