पगार मिळतोय लाखात अन् अधिकारी लाच घेतात हजारात ..! पुणे विभागात सोलापूर दुसरा; शासकीय कामांसाठी पैशाची मागणी सुरूच


पगार मिळतोय लाखात अन् अधिकारी लाच घेतात हजारात ..! पुणे विभागात सोलापूर दुसरा; शासकीय कामांसाठी पैशाची मागणी सुरूच

 

सोलापूर : मागील वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात सोलापूर जिल्ह्यात लाचलुचपतच्या सापळ्यात अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक प्रकरणे पोलिस, महसूल, जिल्हा परिषद विभागातील असून, दुसऱ्या क्रमांकावर भूमी अभिलेख, महापालिका व अन्य विभाग आहे. काही प्रकरणांत लोकसेवकांनी खासगी व्यक्तींचीही मदत घेतल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे. पगार लाखात मिळत असला, तरी हजार रुपयांसाठी लाच घेणारे अधिकाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

 

दरम्यान, भ्रष्टाचाराचे प्रमाण काही केल्या कमी व्हायला तयार नाही. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्याच्या निर्णयाचाही सकारात्मक फायदा झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, सोलापुरात लाचखोरीची प्रकरणे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मागील सहा महिन्यांत सोलापूर जिल्ह्यात १५ सापळा कारवाया यशस्वी झाल्या असून मागील वर्षीच्या तुलनेत १ ने वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

 

पुणे विभागात सोलापूर आहे दुसरा

Advertisement

सोलापूर जिल्ह्यात लाचखोरी वाढली आहे.लाच घेण्यात सोलापूर जिल्हा पुणे विभागात प्रथम आहे, याशिवाय प्रथम क्रमांकावर र पुणे, द्वितीय सोलापूर, तृतीय कोल्हापूर, चतुर्थ सातारा, पाचवा सांगली असा क्रमांक लागतो. सहा महिन्यांत पुणे विभागात ७१ सापळा कारवाया यशस्वी झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर राज्यात पुणे विभागाही लाचखोरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

खासगी व्यक्तींचाही सहभाग वाढतोय

यंदाच्या वर्षी झालेल्या अनेक कारवायांमध्ये खासगी व्यक्तीचा सहभाग वाढल्याचे दिसून येते. अधिकारी लाच घेताना खासगी व्यक्तींचा आधार घेत आहेत. महसूल, जिल्हा परिषद, पोलिस विभागातील अधिकारी खासगी व्यक्तींचा सहभाग वाढवितानाची आकडेवारी समोर आली आहे.

 

पैसे मागितल्यास या ठिकाणी करा तक्रार

लाच मागणी विरोधात एसीबीकडे तक्रार करण्यास घाबरू नका. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालू नका, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. याशिवाय भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. सरकारी कामाकरिता आपल्याकडे लाचेची मागणी होत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कळवा.

 

लाचखोरीत कोणता विभाग आहे टॉप?

१) महसूल

२) पोलिस

३) जिल्हा परिषद

४) भूमी अभिलेख

५) राज्य परिवहन

६) पंचायत समिती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!