पुणे जिल्हा : मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी; प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर अद्यापही कार्यरत


पुणे जिल्हा : मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी; प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर अद्यापही कार्यरत

पुणे – शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्राच्या दत्तनगर येथील जिल्हा परीषद शाळेतील महेश आनंदराव काळे व केलास फक्कड पाचर्णे या दोन शिक्षकांनी शिक्षणविस्तार अधिकारी रघुनाथ पवार यांना दि.२८ जून रोजी मारहाण केली होती. तातडीने त्या दोघांवर गट विकास आधिकारी महेश डोके यांनी दि. १ जुलै रोजी निलंबनाची कारवाई केली होती.परंतू ते त्या शाळेवर अद्यापही कार्यरत आहे.

 

निलंबनाचा आदेश त्यांना व्हॉट्स अप,ई मेल, टपालाद्वारे पाठवण्यात आला होता.केंद्रप्रमुख दगडू वेताळ हे प्रत्यक्ष निलंबनाची ऑर्डर घेऊन गेले होते. त्यांनी स्विकारण्यास नकार दिला. गटविकास आधिकाऱ्यांचा आदेश डावलून शिक्षक त्या शाळेवर कामकाज करत आहे. दोन दिवस रजेवर जावून ते परत हजर झाले. त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या अनिल वाखारे या शिक्षकाला तेथून परत जाण्यास भाग पाडले. आता तालुक्यातील राजकिय पुढाऱ्यांद्वारे ते प्रशासणावर दबाव आणत असल्याची चर्चा होत आहे. या प्रकाराबाबत गट शिक्षण आधिकारी हे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांच्या भेटीला गेल्याची सुत्रांची माहीती आहे.

Advertisement

 

तीन वर्ग खोल्यांना त्यांनी कुलुप लावले असून ते आज ( दि. ०८) रोजी रजेवर गेले आहे. सर्व रजिस्टर कुलुपबंद असून त्यांच्या जागी येणाऱ्या शिक्षकाला हजेरी लावणे मुश्किल झाले आहे. १ तारखेला निलंबित केल्याची ऑर्डर असताना मारहाण करणारे मुजोर शिक्षक वरिष्ठांचे आदेश जुमानत नसल्याची चर्चा तालुका भर होत आहे. यांना कोण पाठीशी घालयत?राजकीय दबावापोटी प्रशासनाला निलंबन मागे घ्यावे लागणार का? अशी चर्चा शिरूर तालुक्यातील शिक्षकांमध्ये चांगलीच रंगली आहे.

 

राजकीय नेत्यांनी या शिक्षकांना वाचवण्यासाठी मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना फोन केल्याची माहीती समोर येत आहे. आता या घटनेबाबत मारहाण झालेल्या विस्तार आधिकाऱ्याला न्याय मिळणार का?हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

बळजबरीने हे शिक्षक शाळेवर येत आहे. मी निलंबनाचा आदेश दिला असता त्यांनी तो स्विकारला नाही. ते परत दोन दिवस रजेवर गेले आहे.सर्व रजिस्टर लॉक करून ठेवल्याने नविन शिक्षकाची दुसऱ्या नवीन रजिस्टरवर हजेरी घेणार आहे.

दगडू वेताळ -केंद्रप्रमुख


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!