पंढरपूर परिसरात १५ ते १९ जुलै दरम्यान मद्य विक्री बंदचे आदेश


पंढरपूर परिसरात १५ ते १९ जुलै दरम्यान मद्य विक्री बंदचे आदेश

पंढरपूर – आषाढी एकादशी पंढरपूर यात्रानिमित्त पंढरपुर शहर व परिसरात १५ ते १९ जुलै दरम्यान मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून ५ कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. तसेच २० व २१ जुलैला पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून पाच किलो मीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री, व ताडी दुकाने सायंकाळी ५ पासून बंद राहणार आहेत.

Advertisement

 

आषाढी एकादशी पंढरपूर यात्रानिमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने गुरूवारी (ता.११) नातेपुते, शुक्रवारी (ता.१२) माळशिरस व अकलूज, शनिवारी (ता.१३) वेळापूर, बोरगांव ,श्रीपूर माळीनगर, रविवारी (ता. १४) भंडीशेगाव, पिराची कुरोली व सोमवारी (ता.१५) वाखरी येथे पूर्ण दिवस मद्य विक्री बंद राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!