शरद पवार म्हणतात, शेतकऱ्यांना वीज मोफत कशाला?


शरद पवार म्हणतात, शेतकऱ्यांना वीज मोफत कशाला?

मुंबई – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय देखील यात घेण्यात आला होता. यावरून शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे

 

फुकट वीज झाल्यावर शेतात मोटार बंद करायला कोण जाणार? यामुळे पाणी जाऊन जाऊन त्यांची जमीन क्षारपड होईल. यामुळं त्यांचं भवितव्य उध्वस्त करायचं नसेल तर फुकटाचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होत असतो. त्याचा गैरवापर न करणे याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी, अशी टीका शरद पवारांनी सरकारवर केली आहे. यानंतर शरद पवारांवर टीकास्त्र डागण्यात येत आहे.

शरद पवारांनी कायमचं शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांना विरोध केल्याचे बोलले जात आहे. गरीब शेतकऱ्यांना फुकटची वीज मिळू नये त्यांचे बिल माफ होऊ नये असं शरद पवारांना वाटते का असा सवाल आता उपस्थित केले जात आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करत राहाव्यात का? असं शरद पवारांना वाटते का, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. शरद पवार हे पूर्वी कृषिमंत्री होते तर तेव्हापासून त्यांनी शेतकरी विरोधी भूमिका कायम ठेवली आहे, असंही बोललं जात आहे

Advertisement

 

https://x.com/SunainaHoley/status/1810303056619418042?t=mep60tvmcb5FZL_fqsqQiA&s=19

 

शरद पवार हे २००४ ते २०१४ पर्यंत सत्तेत सहभागी असताना त्यांनी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले नाहीत. केंद्रीय वित्त मंत्रालयाने सहकारी साखर कारखान्यांच्या उत्पादनावर आयकर आकारण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने ते भरण्यास सांगणाऱ्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. ज्या सहकारी साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला नफा समजून जास्त दर देत असत, त्यांना प्राप्तिकर विभाग नोटिसा पाठवत असत. साखर कारखानदारांनी शरद पवार यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेकदा विनवणी केली होती, पण त्यांनी कधीही ठोस भूमिका घेतली नसल्याची माहिती आहे.

 

केंद्रात सत्तेत असताना शरद पवारांनी १० वर्षे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याचा निर्णय घेतला नव्हता. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार होता. त्यामुळेच आता मोफत वीज देण्याच्या सरकारवर टीका करणारे शरद पवार टीकेचे धनी बनले आहेत, असं चित्र उभं राहिलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!