CM शिंदेंनी आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचा बहिष्कार…!


CM शिंदेंनी आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचा बहिष्कार…!

 

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं.

 

फडणवीस काय म्हणाले ?

Advertisement

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या आरक्षणाविषयीच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकलेल्या महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. ते म्हणाले, “मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अगदी ठरवून ऐनवेळी संध्याकाळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला.

 

मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला त्यांना वेळ नाही. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात. त्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यामुळे एकप्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!