पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची दखल राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले आश्वासन


पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची दखल राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले आश्वासन

सोलापूर (प्रतिनिधी ) लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून अंगावर ऊन वारा थंडी पाऊस रोगराई महापूर अशा कोणत्याही संकटाची तमा न बाळगता जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहोचण्याचे काम हे वृत्तपत्र विक्रेते करत आहेत. राज्यातील वृत्तपत्र विक्रेते अनेक मूलभूत गरजा पासून वंचित असून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे उतार वयात खूप हाल होत आहेत.

Advertisement

 

त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होतो महाराष्ट्र राज्यात जवळपास अडीच लाखाहुन अधिक वृत्तपत्र विक्रेते असून अश्या वृत्तपत्र विक्रेते यांच्या भविष्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून राज्यातील वृत्तपत्र विक्रेते यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची मागणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 20 / 12/ 2023 रोजी निवेदन च्या माध्यमातून केली होती यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक शाहनवाज कंपली दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद उपस्थित होते.

 

वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक असून, पत्रकार सुरक्षा समिती वतीने वृत्तपत्र विकते यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापण करण्याची मागणी केली त्या मागणी ची दखल घेऊन राज्यातील वृत्त पत्र विक्रेते यांच्यासाठी लवकरच कल्याणकारी मंडळाची घोषणा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!