शौचालयात सुटे पैसे नसल्याचं सांगताच बेदम मारहाण, चेहऱ्यावर अॅसिड टाकलं; बदलापूर रेल्वे स्थानकावरील घटना


शौचालयात सुटे पैसे नसल्याचं सांगताच बेदम मारहाण, चेहऱ्यावर अॅसिड टाकलं; बदलापूर रेल्वे स्थानकावरील घटना

ठाणे : बदलापूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील शौचालयात गेलेल्या एका प्रवाशावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बाथरूम वापरल्यावर पैसे दिले नसल्याने बाप-लेकाने प्रवाशावर अॅसिड हल्ला केला.

 

या हल्ल्यात 28 वर्षीय विनायक बाविस्कर या प्रवाशाच्या डोळ्यात अॅसिड गेल्याने त्यांचा डोळा निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी जखमीवर उपचार सुरू असून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

 

बदलापूर रेल्वे स्थानकावरील शौचालयामध्ये शौच करण्यासाठी गेलेल्या एका वर्षीय युवकाने 5 रुपये सुट्टे नसल्याचं सांगितलं. त्यानंतर शौचालय चालक आणि त्याच्या 15 वर्षीय अल्पवीयन मुलाने त्या तरुणाला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या युवकाच्या चेहऱ्यावर बाथरूम क्लिनर फेकलं. त्यामध्ये त्या युवकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर असलेल्या शौचालयात घडली.

 

शौचालय चालकाला अटक

Advertisement

 

याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शौचालय चालक योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय 47) याला अटक केली. तर त्याच्या 15 वर्षीय अल्पवीयन मुलाला ताब्यात घेतलं. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तर तक्रारदार विनायक बाविस्कर हे बदलापूर पश्चिम भागातील गोकुळधाम कॉप्लेक्समध्ये कुटुंबासह राहतात.

 

पाच रुपये सुटे नसल्याने वाद

 

तक्रारदार विनायक बाविस्कर सोमवारी (19 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थनाकात नैसर्गिक विधीसाठी बदलापूर स्थानकातील शौचालयाचमध्ये गेला होता. शौच करून बाहेर आल्यानंतर आरोपी बाप लेकाने विनायककडे शौचाचा वापर केल्याबद्दल 5 रुपयाची मागणी केली. मात्र विनायककडे सुट्टे 5 रुपये नसल्याने त्याने नकार दिला.

 

या प्रकरणी वाद होऊन आरोपी बाप लेकानी मिळून विनायकला बेदम मारहाण केली. 15 वर्षीय अल्पवीयन मुलाने विनायकच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अॅसिड फेकलं. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरोपी बाप लेकाला ताब्यात घेतलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!