विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना तपासणी दरम्यान सापडले साडेपाच लाख रुपये; पोलिसांकडून अधिक कसून चौकशी सुरू
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना तपासणी दरम्यान सापडले साडेपाच लाख रुपये; पोलिसांकडून अधिक कसून चौकशी सुरू
तुळजापूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. याच अनुषंगाने तामलवाडी येथे पोलिसांनी तपासणी दरम्यान एक इको गाडी अडवली. तपासणीदरम्यान गाडीतून साडेपाच लाख रुपये रोख रक्कम आढळून आली आहे.
सदर सुझुकी इको गाडीत काही व्यापारी प्रवास करत होते. हे व्यापारी कर्नाटक राज्यातून तुळजापूरकडे येत होते. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाल्याने ती तातडीने जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक कसून चौकशी करण्यात येत आहे घटनास्थळी तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख उपस्थित राहून तपासाची पाहणी केली.
विशेष प्रविण राठोड तुळजापूर धाराशिव