महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाचे नळदुर्ग येथील बस स्थानक व व्यापारी संकुल विकसित करणे करिता प्रकल्प सल्लागार यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी- कुलदीप पाटील
महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाचे नळदुर्ग येथील बस स्थानक व व्यापारी संकुल विकसित करणे करिता प्रकल्प सल्लागार यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
नळदुर्ग – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाचे नळदुर्ग येथील बस स्थानक व व्यापारी संकुल विकसित करणे करिता. मागील महिन्यामध्ये 12 सप्टेंबर रोजी डी जी पी एस द्वारे सर्वे करण्यात आला होता. आज रोजी मंडळाचे पॅनल वरील प्रकल्प सल्लागार हे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी आले होते.
स्थानिक आमदार राणा जगजिसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे तेर, धाराशिव व नळदुर्ग बस स्थानक येथे बस स्थानक व व्यापारी संकुल विकसित होणार आहे. त्यामधील धाराशिव बस स्थानक चे काम जोऱ्याने सुरू आहे आणि व्यापारी संकुल चे निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
व्यापारी संकुल विकसित केले मुळे स्थानिक स्थरावर युवा उद्योजकांना मोक्याच्या जागी दुकाने उपलब्ध होऊन रोजगार निर्मिती होणार आहे. आज व्यापारी संकुल तसेच मंडळाकरिता बस स्थानक करिता प्लॅटफॉर्म रचना निश्चित करणे हा पाहणीचा उद्देश होता.
महामंडळाने नळदृग बस स्थानक सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर म्हणजेच बांधा वापरा व हस्तांतर करा तत्त्वावर विकसित करण्यासाठी प्रकल्प सल्लागार यांना कार्यादेश दिलेला आहे. वरील प्रकल्पामध्ये विकासक बस स्थानकाचा बांधकाम विना मोबदला करून व्यापारी संकुल विकसित करणे करिता आवश्यक जागे करिता प्रीमियम म्हणजेच रक्कमेची बोली लावणार आहेत.
मागील महिन्यामध्ये महामंडळाने सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पास प्रोत्साहन देण्याकरिता विकासाचा लीज कार्यकाळ तीस वर्ष ते साठ वर्ष करण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळास अधिकाधिक प्रीमियम मिळण्यासाठी द्वार मोकळे झाले आहेत.राणा जगजतसिंह पाटील यांच्या सतत पाठपुरावा व मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे त्यामुळे तेर नळदुर्ग व धाराशिव बस स्थानक नकीच जागतिक दर्जाचे होईल.
– कुलदीप पाटील