तुमचे रिपोर्ट एकदम ओके देतो म्हणून 1 लाख रुपये ची लाच घेताना सुप्रसिद्ध डॉक्टर अँटी करप्शन च्या जाळ्यात..!
सोलापूर – रक्त तपासणी केंद्राचा अहवाल सकारात्मक देतो म्हणून 1 लाखाची लाच घेताना महात्मा फुले जन आरोग्य सोलापूर केंद्राचे प्रमुख डॉ माधव जोशी यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.ही कारवाई बुधवार 18 डिसेंबर रोजी दुपारी दोन च्या सुमारास सात रस्ता येतील एका हॉटेलच्या समोर सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे.रक्त लघवी तपासणी करणाऱ्या खाजगी प्रयोगशाळे ला महात्मा फुले जन आरोग्य विभागाकडून टेंडर मिळाले होते.परंतु त्या प्रयोगशाळे विरुद्ध नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने त्याबाबत तपासणी करण्याचे आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी डॉ माधव जोशी यांच्याकडे होती. त्या प्रयोगशाळे चा अहवाल सकारात्मक देण्यासाठी प्रयोगशाळा चालकाकडे माधव जोशी यांनी 2 लाखाची लाचेची मागणी केली आणि 1 लाखाचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी डॉ माधव जोशी यांना सापळा लावून रंगेहात पकडले.ही कामगिरी सोलापूर लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे .