सोलापूर (प्रतिनिधी )- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून उभं आयुष्य सर्वसामान्य माणसांच्या त्याचबरोबर अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आपल्या वृत्तपत्रातून आवाज काढत समाजाचा आरसा समजून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या अनेक संपादकांचे वय झाल्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत साप्ताहिक वृत्तपत्र राज्य शासनाच्या यादीवर नसल्याने राज्य सरकारच्या जाहिराती मिळत नाहीत त्यामुळे यादीवर नसलेल्या वृत्तपत्राच्या संपादकाची अवस्था आज अतिशय बिकट व दयनीय झालेली आहे उभं आयुष्य समाजाच्या विकासासाठी भल्यासाठी खर्ची घालणाऱ्या संपादकाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली अनेक वर्षांपासून साप्ताहिक वृत्तपत्र चालवत असताना वयोवृद्ध व आजारपणात औषधाचा खर्च देखील भागवता येत नाही कोरोना सारख्या जीव घेण्या रोगात देखील राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकानी आपले कुटुंब बाजूला सारून राष्ट्रीय कर्तव्य समजून राज्य सरकारचे जनतेच्या हितासाठी असलेले आदेश निर्देश त्याचबरोबर कोरोना महामारी संदर्भातील आपला जीव धोक्यात घालून वार्ताकन केले आहे अशा राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे याबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने मा जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिनांक 23/9/2024 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते तसेच दिनांक 11/10/2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच बरोबर दिनांक 26/10/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना देखील पत्रव्यवहार केला होता.
महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या व जेष्ठ असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रा च्या संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन मिळणे बाबत राज्य सरकार कडे पाठपुरावा करावा अशी ही विनंती करण्यात आली होती परंतु आदर्श आचार संहिता त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूका लागल्यामुळे राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन बाबतच्या पत्रकार सुरक्षा समिती मागणी राज्यसरकारकडे प्रलंबित राहिली आहे याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने रविवार दिनांक 15/12/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर (आंदोलन गेट) या ठिकाणी जोरदार धरणे आंदोलन करण्यात येत आले .यावेळी पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बीएस ) जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर शहर अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकप्रधान चे कार्यकारी संपादक अस्लम शेख प्रवीण राठोड रक्षंदा स्वामी योगीनाथ स्वामी अरुण सिडगिद्दी राजू वग्गू किसन शिंदे शाहिद शेख तानाजी माने वसीमराजा बागवान सिद्राम येलदी इम्रान आत्तार कलीम शेख सह पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष युनूस आत्तार सचिव लतीफ शेख कार्याध्यक्ष डी डी पांढरे उपाध्यक्ष अस्लम नदाफ रफिक देगनाळकर इस्माईल शेख जेष्ठ पत्रकार मिलिंद (नाना ) प्रक्षाळे रियाज हंजगीकर इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते
जोरदार घोषणाबाजी
राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ संपादक पेन्शन प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने जोरदार घोषणा बाजी करण्यात आली
कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही
पत्रकार सुरक्षा समितीची विजय असो
जेष्ठ संपदकांना पेन्शन मिळालीच पाहिजे अश्या घोषणानी जिल्हापरिषद परिसर दणानूण सोडण्यात आला. यावेळी कृती समितीचे मुन्ना पठाण आन्सर तांबोळी व युनूस अत्तार व यांनी आपले मनोगत व्यक्त केले