तुळजापूर दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयात दलालांच्या मार्फत लाखो ची लूट;अधिकारी मात्र शेप

तुळजापूर दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयात दलालांच्या मार्फत लाखो ची लूट;अधिकारी मात्र शेप

तुळजापुर – येथील दुय्यम निबंधक तुळजापूर श्रेणी १ कार्यालयात दलालांमार्फत कामे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नसल्यामुळे वरिष्ठांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून होऊ लागली आहे.

तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या जोमात सुरू आहे या संधीचा फायदा घेत दलालाचां सुळसुळाट सर्वीकडे दिसून येत आहे.

प्लॉट तसेच खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या जोमात सुरू आहे काही दलालांनी थेट शेतकऱ्यांशी एक भाव ठरवून व्यापाऱ्याला दुसरे भाव ठरवून लाखो रुपयाची दलाली घेतल्या जात असल्याचे चर्चा जोरात सुरू आहे.

या भागातील काही दलाल व अर्जंविसांचे मधुर संबंध असल्यामुळे शेतकऱ्यांना घेऊन वर्ग दोनची जमीन वर्ग एक करून देतो थांब घेऊन येतो आपल्याला कागदपत्र करावे लागतात यासाठी शासनाकडून मंजुरी घ्यावे लागते असे अनेक कारणं सांगून शेतकऱ्याला हतबल करतात व यासंधीचा फायदा दलाल लोकांनीमोठ्या प्रमाणात घेत आहेत दलारांच्या सुळसुळाटामुळे सामान्य नागरिक हतबल झाली असून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जात आहे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय येथी दलालाचा वावर कमी करावा व शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

जमीनधारकांना खरेदी विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातून कामकाज पाहिले जाते. आणि सध्याच्या काळात जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, अशातच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तुळजापूर दुय्यम निबंधक कार्यालयात दलालाशिवाय नागरिकांची कामे होत नसल्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मागच्या अनेक महिन्यापासून हा प्रकार सुरू असून याकडे वरिष्ठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. तालुक्यात अनेक गावांचा सामावेश आहे. येथील तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक हा जमीन खरेदी विक्रीकरिता महत्त्वाचा विभाग आहे.

मात्र या ठिकाणी सर्वच कामे दलालांमार्फत होत असल्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

येथील दुय्यम निबंधक कार्यालय दलालामार्फत सुरू आहे. नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत. अधिक मूल्यांकन दाखवून भाव केले जातात असल्याचा प्रकार बेफिकिरपणे सुरू असून याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

तहसील कार्यालयातील महत्त्वाच्या विभागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालाशिवाय कामे होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र यावर कुणीही कारवाई करायला तयार नाही.तेरी भी चुप मेरी भी चुप ही भूमिका शासन बजावत आहे.


विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!