उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे होणार आंदोलन .
मुख्यालय सहाय्यक व अधिकारी यांचा मनमानी कारभार तर वरिष्ठांचा अभय ? कारवाईवर ?
तुळजापूर : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथील मनमानी कारभारामुळे नागरिकांची हेडसांड होत असून मुख्यालयात कर्मचारी व मुख्यालय सहाय्यक न राहता पुणे,लातूर ,धाराशिव,या ठिकाणी रहात असून 2020 ते आज पर्यंत मुख्यालयात राहत असल्याचे दाखवून शासकीय फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर निवेदन देऊनही कारवाही केली जात नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने सोमवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर या कार्यालयासमोर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर व जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागण्या मान्य होईपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात आले होते .
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर या कार्यालयाचा गैरकारभार सातत्याने चव्हाट्यावर येत असून कर्मचारी हे शासनाचे मुख्यालयात राहण्याचे परिपत्रक असताना पण जाणीवपूर्वक व वरिष्ठांचा अभय घेऊन या कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक पुणे व लातूर या ठिकाणी राहत असून त्याच बरोबर येथील कर्मचारी व शिपाई वर्ग हे धाराशिव या ठिकाणी राहत असल्याचं दिसून येत आहे .मुख्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अधिकारी ऑफिसला वेळेवर येत नसल्यामुळे तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे .अधिकारी वर्ग दौऱ्याच्या नावाखाली जात असून दौरा चार्ट किंवा दौऱ्याची मागणी केली असता मुख्यालय सहाय्यक यांनाच माहीत नाही अधिकारी आहेत कोठे .याबाबत जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी अनेक वेळेस निवेदन देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत मुख्यालय सहाय्यक व कर्मचारी यांना वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे .तसेच शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली येथील अधिकाऱ्याकडून होत आहे .
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांच्याकडून पंधरा दिवसाच्या आत सदर निवेदनाच्या अनुषंगाने कारवाही करू अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे .परंतु पंधरा दिवसात कारवाई नाही झाली तर पुन्हा आंदोलन करू अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली आहे .