तलाठी, मंडल अधिकार्‍यांनी व उपळा येथील ग्रामस्थांनी संगणमत करून ; जमिनीची लावली विल्हेवाट,पमाबाई गणपत घाडगे यांची फसवणूक

तलाठी, मंडल अधिकार्‍यांनी व उपळा येथील ग्रामस्थांनी संगणमत करून ; जमिनीची लावली विल्हेवाट,पमाबाई गणपत घाडगे यांची फसवणूक

तुळजापूर : तलाठी गोकुळ शिंदे व मंडळ अधिकारी १. नाईकनवरे आर, एस. २. राऊत बी.बी. ३. ए बी तिर्थकर यांनी संगनमत करुन पमाबाई गणपत घाडगे यांच्या नावे असलेली जमीन पडवळ यांच्या नावे केल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील घाडगे यांनी दि.१६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.निवेदनात असे नमूद केले आहे की,धाराशिव तालुक्यातील उपळा(माकडाचे ) साल सन 2017-18 या कालावधीमध्येयेथील सज्जाचे तलाठी गोकुळ शिंदे व सदर कालावधी मध्ये मंडल अधिकारी १. नाईकनवरे आर, एस. २. राऊत बी.बी. ३. ए बी तिर्थकर यांनी संगनमत करुन व कागदाची आपरा तफर करुन मौजे उपळा माकडाचे येथिल गट नंबर 780, ज्याचे क्षेत्र 0 हे 90 आर हे पमाबाई गणपत घाडगे यांच्यानावे असलेली जमीन उपळा येथिल ग्रामस्त १. भरत लिंबराज पडवळ २. दत्तात्रय लिंबराज पडवळ ३. आगतराव लिंबराज पडवळ यांच्या कडून 100 रुपयेचा स्टॅम्प घेऊन अर्जदारास कुठलीही नोटीस न देता यांच्या नावे जमीन करण्यात आली यामुळे अर्जदाराचे कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे अर्जदार यांच्या आज्जीच्या लेकरा बाळाच्या तोंडात वरील भ्रष्ठ अधिकाऱ्यांनी माती घातली आहे अश्या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करुन यांच्यावर कडक कार्यवाही करावी तसेच यांनी भ्रष्टाचार करुन कमवलेली मालमत्ता व प्रॉपर्टी यांची सखोलं चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व कुटुंब मिळून जिल्हा अधिकारी कार्यलया समोर अमरण उपोषण करणार असल्याचे एका लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर सुनिल हणमंतराव घाडगे यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!