मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या जाचक अटी शिथिल करा : मधुकर शेळके
तुळजापूर : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनामध्ये जाचक अटी निकष न लावता पूर्वीप्रमाणेच सर्व महिलांना योजनेचा लाभ देणे बाबत दि.१६ डिसेंबर रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री,महाराष्ट्र शासन मुंबई यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही त्रुटी न पाहता सरसकट महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत पंधराशे रुपये खात्यावर देण्यात आले.यानंतर नुतन देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडून राज्य सरकारने नवीन जीआर काढून लाडक्या बहिणीला अडचणीत आणले आहे. यामध्ये अनेक जाचक अटी निकष लावण्यात आले आहेत यामुळे अनेक महिला वंचित राहणार आहेत तरी राज्यातील सर्व सरसकट महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय केलेला असल्याने राज्य सरकारने सरसकट लाडक्या बहिणींना कोणत्याही कागदपत्राची त्रुटी न पाहता, जाचक अटी निकष न लावता सरसकट पैसे देण्यात यावेत. या जाचक अटी निकष लावल्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
राज्यामध्ये लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारला अद्भुतपूर्वक यश मिळालेले आहे या बहिणीवर अन्याय होताकामानये सरसकट महिलांना राज्य सरकारने अनुदान द्यावे असे नूतन मुख्यमंत्री यांना निवेदन रजिस्टर बाय पोस्ट केले आहे.मधुकर बबनराव शेळके आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव यांची या निवेदनावर स्वाक्षरी आहे.
विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव