परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ वेळापूर शहर बंद यशस्वी.
वेळापूर – परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ वेळापूर शहर बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला तसेच विविध मागण्यांचे अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी वेळापूर येथील आंबेडकरी जनतेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस सो यांना वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपति शाहू महाराज , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवर काम करणारे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.