नागपूर – नागपूर एम्सच्या धर्तीवर होणार वैद्यकीय महाविद्यालयाचे आधुनिकरण आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली , २० डिसेंबरला एम्सच्या संचालकांसोबत अधिष्ठाता व बांधकामचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्याप्रकारे अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता नागपूर एम्सच्या धर्तीवर धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आधुनिकरण केले जाणार आहे. एम्सची कार्यपद्धती, सोयी सुविधा, इमारत आणि अनुषंगिक बाबींची पाहणी करून त्यासंबंधी माहिती जाणून घेतली. आपल्याकडे त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वास्तुरचनाकार यांची २० डिसेंबर रोजी नागपूर येथे एम्सच्या संचालकांसह बैठक आयोजित केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मंगळवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागपूर येथील एम्सच्या कार्यपद्धती आणि एकूण कामकाजाबाबत एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. रमेश जोशी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच धाराशिवमध्ये नागपूर एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. एम्समध्ये दररोज बहारुग्ण विभागात सुमारे तीन हजाराहून अधिक तर अंतररुग्ण विभागात आठशे रुग्णांची अद्ययावत पद्धतीने तपासणी आणि उपचार केले जातात. अगदी त्याच पद्धतीने आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. त्यासाठी २० डिसेंबरला नागपूर येथील एम्स रुग्णालयात कार्यकारी संचालक डॉ. रमेश जोशी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

नागपूर एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आधुनिकरण करून संपूर्ण महाविद्यालय आणि वैद्यकीय संकुल अद्यावत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, बांधकाम विभागाचे अधिकारी, वास्तुविशारद तसेच आयडिया कॉम्पिटिशन स्पर्धेतील सहभागी विजेते या सर्वांची एकत्रित बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत वैद्यकीय संकुलाची इमारत, अत्याधुनिक सोयी सुविधा, अंतर्गत व्यवस्था, विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग यांच्यासाठी अत्यावश्यक असलेल्या बाबी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णांवरील दर्जेदार उपचार यासाठी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. जोशी महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि माहिती उपलब्ध करून देणार आहेत. नागपूर एम्सच्या धर्तीवर आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आधुनिकरण करण्यासाठी या बैठकीची मौलिक मदत होईल. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने लवकरच त्याअनुषंगाने प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव