मोहिते पाटलांच्या अडचणीत पुन्हा वाढ; आधी पक्षाची तर आता सहकार विभागाची नोटीस
सोलापूर – भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्या विरोधात आता सहकार विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर ठपका ठेवला असल्याने त्यांना त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून का अपात्र ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शंकर सहकारी साखर कारखान्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अध्यक्ष असून या कारखान्याला भाजप सरकारने मोठे आर्थिक पॅकेज दिलेले आहे.
मात्र, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी पक्ष विरोधी काम केल्याच्या तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता यानंतर लगेच त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरून अपात्र का ठरवू नये अशा पद्धतीची नोटीस दिली असून 16 जानेवारी पर्यंत त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. या वेळेत जर त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येणार आहे, त्यामुळे आता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.