रेल्वे कॉलनीत धान्य वितरण विभागाचा छापा वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना कारवाई
सोलापूर – बुधवारी रेल्वे कॉलनी येथे अन्नधान्य वितरण विभागाने अवैधरीत्या घरगुती व अवैध गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये प्रत्यक्ष भरताना टाकलेल्या छाप्यात घरगुती व अवैध गॅस सिलिंडरसह मशिनरी जप्त करण्यात आली. मंगळवारी सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
यावेळी परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक, नितीन वाघ, अनिल गवळी, नंदकिशोर ढोके व पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरे, सज्जन भोसले, ज्ञानेश्वर काशीद यांच्यासह सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, शहाजहान मुलाणी, लक्ष्मीकांत फुटाणे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या पथकांमार्फत सुरू आहे.