देहविक्री करणाऱ्या महिला व तृतीपंथीयांच्या अधिकारांचे हणणं होऊ नयेअतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग
सोलापूर – देहविक्री करणाऱ्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी, हा घटक आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाचा, समाजिक स्वास्थ्यचा, आरोग्याचा समतोल राखण्यात या वंचित घटकांचा महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र अनेक वर्षापासून हा घटक अधिकारांपासून वंचित होता. समाजिक संस्था व न्यायालयीन क्षेत्रात कार्य करणाऱ्या कायदे पंडितांनी देहविक्री करणाऱ्या महिला व तृतीपंथीयांच्या अधिकारांचे हणणं होऊ नये यासाठी प्रयत्नशील असावे असे त्या म्हणाल्या.
त्या क्रांती महिला संघ व स्वाती महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने साई प्रसाद हॉटेल येथे जिल्हा वकिली बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्या उदघाटन समारंभा प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या – उदघाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी प्राधिकरणाचे दिवाणी न्यायाधीश उमेश देवऋषी होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, ॲड. महाडकर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या दिपाली शिवपुरे, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रकल्प अधिकारी सुवर्णा गाडेकर, जी.एफ. ए. टी. एम. प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी नागेश गंजी, हर्षल अहिरे, क्रांती संघ महिला संघाच्या अध्यक्षा काशीबाई आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, काशीबाई जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप न्यायाधीश उमेश देवऋषी यांनी केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानंदा थिटे, संगीता चव्हाण, लक्ष्मी टोणपे, आसिफ शेख, कविता भालेराव, डोके मॅडम, सी.19 चे अकाउंट ऑफिसर ओंकार व एस. आर. एस. एम. एस.चे व्ही. सी.दत्तात्रय कामाठी आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका जाधव यांनी केले. स्वागत अमीना शेख यांनी केले. प्रास्ताविक दीपक गुंजे यांनी केले तर आभार सविता गायकवाड यांनी मानले.