पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुका बैठक
मोहोळ – पत्रकार सुरक्षा समिती तालुका मोहोळ ची बेगमपुर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष बंडू तोडकर होते या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना वर (विविध विषयावर चर्चा ) चर्चा करण्यात आली तसेच राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ली धमकी मारहाण बाबत चिंता व्यक्त करून असे प्रकार थांबण्यासाठी राज्य सरकार ने वेळीच योग्य ते पाऊल उचलायला हवे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणून लढा उभा करणार, जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण ही चिंतेची बाब असून सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणून व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांनी बैठकित सांगितले यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद मोहोळ तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर सचिव शहाजी शिंदे प्रसिद्धी प्रमुख अजय तोडकर संघटक महादेव शेवाळे सदस्य अतुल भोई उपस्थित होते.