रणजीत चव्हाण यांची रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
सोलापूर – रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत व प्रदेशाध्यक्ष दीपक राव भोसले यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी रणजीत चव्हाण यांची निवडीचे पत्र रयतचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी दिले सदर निवडी बद्दल माळशिरस तालुक्यात सह सोलापूर जिल्ह्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे रंजीत चव्हाण हे गेली दहा वर्ष शेतकरी चळवळीमध्ये काम करत असून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते कायम रस्त्यावरची लढाई लढतात ऊस आंदोलन दूध आंदोलन पाण्यासाठी आंदोलन रास्ता रोको असेल अशा प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली असून त्यामुळे त्यांच्यावरती आमदार सदाभाऊ खोत यांनी विश्वास ठेवून त्यांची निवड केलेली आहे
आगामी काळामध्ये माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी व शेतकरी शेतमजूर शेताभातामध्ये राबणारा शेतकरी व गावगाडा यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही असे नूतन जिल्हा उपाध्यक्ष रणजीत चव्हाण यांनी सांगितले यावेळी राज्य प्रवक्ते राहुल बिडवे गणेश कोडक बापू वावळ सुधाकर पांढरे गजानन माने अक्षय चव्हाण उपस्थित होते
माळशिरस तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे यास तालुक्याने माझी ओळख संपूर्ण राज्यात करून दिली त्यामुळे या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आम्ही ताकद देणार आहोत राज्यात सरकार आमचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर पार ची लढाई लढणार
-आ.सदाभाऊ खोत (रयत क्रांती संघटना)