सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालय यांची नागरिकांसाठी ई-केवायसी बाबतीत जागोजागी जनजागृती मोहीम
सोलापूर – रेशन प्रणालीत कार्डधारकांना आता केंद्र शासनाने ई-केवायसी करण्याबाबत सक्ती केले आहे,पण ऐन धान्य वाटपावेळी नागरिकांना ई-केवायसी करिता भल्या मोठ्या रांगाना सामोरे जावे लागत असल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांनी गर्दी टाळण्यासाठी जागोजागी शिबिराचे आयोजन केले असून ह्या शिबिरावर लक्ष ठेवण्यासाठी परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक ह्यांचे विशेष नियुक्ती करून स्वतः अन्नधान्य वितरण अधिकारी फिरते पथक वरून सर्व शिबिरावर नियंत्रण ठेवत आहेत.ज्या कार्ड धारकांनी ई-केवायसी केले नाही, अश्या लाभार्थीचे भविष्यात धान्य कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धान्य कमी होत असल्याच्या धास्ती मुळे नागरिकांची आता शिबिराकडे वळताना चित्र दिसत आहेत.शिबिरातही रांगा व गर्दी टाळण्यासाठी एकाच शिबिरात त्याच भागातील किमान 20 ते 25 दुकानदाराचे मनुष्यबळ ही कार्यरत ठेवण्यात आले आहे.
सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने मात्र ह्या मोहिमेला सकारात्मक भूमिका घेतल्याने सोलापूर शहरातील टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी ह्यांनी सुरुवातीला रास्त भाव धान्य दुकानंदाराचे बैठक घेऊन त्यांना ह्या मोहिमे बाबतीत जनजागृती करण्याचे सक्त सूचना देण्यात आले होते. त्याप्रमाणे मागील अवघ्या दोनच महिन्यात नागरिकांमध्ये जनजागृती होऊन शिबिरासमोर रांगा दिसत आहे.केंद्र शासनाच्या ई-केवायसी ह्या मोहिमेला देखील सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी ह्यांनी चांगलाच जोर धरल्याने ई-केवायसी मध्ये देखील सोलापूर शहर राज्यात अग्रेसर आहेत.धान्य वाटपाचे गर्दी टाळण्यासाठी केलेला हा उपक्रम नागरिकांना सोईस्कर ठरल्याने कार्डधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांचे जनसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.