इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धमाकेदार कामगीरी एकुण १३२.८४१ किलो गांजा जप्त.

इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धमाकेदार कामगीरी एकुण १३२.८४१ किलो गांजा जप्त.

इंदापूर – सविस्तर बातमी अशी की ,मा. पोलीस अधिक्षक , पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन यांना एन. डी. पी. एस कारवाया करणेबाबत सुचीत केले होते. त्या अनुशंगाने कारवाई करीत असताना इंदापुर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना गोपनिय बातमीदार यांचेकडून बातमी मिळाली की, मौजे शेटफळ हवेली गावचे हद्दीत दोन इसम हे एका मालवाहतूक टेम्पो मधून (गांजा) एन डी. पी. एस माल विक्री करीता घेवुन येणार आहेत. वगैरे बातमी समजलेवर लागलीच मा. पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना माहीती देवुन त्यांनी सपोनी शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाच्या टिम ला सदरची कारवाई करणेबाबत सुचना दिलेवर सपोनी शंकर राउत व गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस फौजदार प्रकाश माने, पो. हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण, अंकुश माने यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन यातील आरोपी नामे नवनाथ राजेंद्र चव्हाण, वय ३० वर्ष, रा. शेटफळ हवेली ता. इंदापुर जि. पुणे व आरोपी नामे शिवाजी जालींदर सरवदे, वय ३० वर्ष, रा. निरा नरसिंहपुर ता. इंदापुर जि. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे एकुण १३२ किलो ८४१ ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा किंमत रुपये १९,९२,६१५/- रुपये किंमतीचा व आरोपी नामे नवनाथ राजेंद्र चव्हाण वय ३० वर्ष रा. शेटफळ हवेली ता. इंदापुर जि. पुणे याचे ताब्यात एक सिल्व्हर रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल कि. २०,०००/- रू व शिवाजी जालींदर सरवदे वय ३० वर्ष रा. निरा नरसिंहपुर ता. इंदापूर जि. पुणे त्याचे ताब्यात एक निळसर रंगाचा सॅमसंग कपनीचा मोबाईल किंमत १०,०००/- असा व मारूती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलचा मालवाहतुक टेंपो त्याचेवर आर.टी.ओ नंबर नसलेला कि. ३,००,०००/- रू असा एकुण जु. कि. २३, २२,६१५,/- रू चा मुद्देमाल मिळुन आला असुन त्याचेवर गुगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८ (क), २०, २९ अन्वये सहा पो. उपनिरीक्षक प्रकाश माने यांने फिर्याद दिली असुन अधिक तपास सपोनी शंकर राऊत करीत आहेत.सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक साहेब , पुणे ग्रामीण पंकज देशमुख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मा. पोलीस निरीक्षक सो सुर्यकांत कोकणे यांचे मागदर्शनाखाली सपोनी शंकर राउत, गुन्हे शोध पथकाचे सपोनि मोहिते, पोसई गावडे, सहा. पोलीस फौजदार प्रकाश माने, पो. हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण, अंकुश माने, विशाल चौधर, गजानन वानोळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!