महात्मा फुले विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न
सोलापूर – मोरवड येथील महात्मा जोतीराव फुले विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न झाला. मुलांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, शरीर सुदृढ राहावे तसेच एक वेगळाच आनंद मिळवण्यासाठी या क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडासप्ताहामध्ये कबड्डी ,खो-खो ,लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, भालाफेक, क्रिकेट, लिंबू चमचा, स्लो- सायकल, संगीत खुर्ची, इत्यादी खेळांचा समावेश होता, क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनाथ मोहोळकर यांनी केले. यावेळी क्रीडा शिक्षक श्री बाळासाहेब बनगर , श्री भाऊसाहेब हिंगणे ,श्री नवनाथ गायकवाड , श्री गणेश गायकवाड , श्री विक्रम अनारसे , श्री सचिन मोहोळकर , श्री अजिनाथ मोहोळकर सर , सौ.शिल्पा गवारी ,श्री राजेंद्र नाळे श्री हरिचंद्र जाधव, उपस्थित होते.हा क्रीडा सप्ताह पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.