बबनदादा…विधान परिषदेचा शब्द घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करू नका; संवाद मेळाव्यात समर्थक आक्रमक

माढा -विधान परिषेदचा शब्द दिल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही. जो पक्ष रणजितसिंह शिंदे यांना विधान परिषद देईल, त्याच पक्षात प्रवेश करायचा. मग तो शब्द एकनाथ शिंदेंनी देऊद्यात, अजितदादांनी देऊद्यात किंवा भाजपवाल्यांनी देऊद्यात.

बबनदादा… काहीही किंमत मोजायला लागली तरी मोजा; पण विधानसभेतील पराजय धुवून काढण्यासाठी रणजितसिंह शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवा, अशी मागणीच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विष्णू हुबे यांनी माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यासमोरच केली.विधानसभा निवडणुकीत माढ्यातून माजी आमदार बबनराव शिंदे (Babanrao shinde) यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला. निकालाच्या महिनाभरानंतर माढ्या तालुक्यातील पिंपळनेरमध्ये कार्यकर्त्याचा संवाद मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात बोलताना हुबे यांनी माजी आमदार शिंदे यांच्याकडे हा हट्ट धरला आहे. याच मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी सत्तेतील पक्षात सहभागी होण्याचा सूर बोलून दाखवला.

विष्णू हुबे म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) पराभवाला अनेक कारणे आहेत. ती सांगायला आता वेळ नाही. आता पुढील दिशा….पुढील दिशा म्हणजे रणजितसिंह शिंदे यांना परत जनतेच्या दरबारात पाठवायचेच नाही. आता तीन पक्ष सत्तेत आहेत, त्यातील जो पक्ष रणजितसिंह शिंदे यांना विधान परिषद देईल, त्याच पक्षात प्रवेश करायचा. बबनदादा…काहीही किंमत मोजा. आम्हाला सांगायचं नाही. हा पराजय धुवून काढण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. ते तुम्ही करू शकता. पण रणजितसिंह शिंदे यांना विधान परिषदेत पाठवा.

‘हुबे म्हणाले, विधान परिषद देण्याचा शब्द दिल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही. मग तो शब्द माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊद्या, भाजपवाल्यांनी देऊद्यात किंवा अजितदादांनी देऊद्यात. काहीही किंमत मोजायची ती मोजा; पण आपल्याला सत्तेत जावंच लागेल. सत्तेत चला आणि या लबाड लांडग्याला (आमदार अभिजित पाटील यांना उद्देशून)हुबे म्हणाले, आपण जर सत्तेत गेलो नाही तर… घड्याळाकडे जाऊ शकत नाही. उद्या जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर हा लबाड लांडगा तिथं समोर आहे. त्यामुळे हे दोन पक्ष अजित पवार आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे असूद्या नाही तर कमळ असू द्या. त्या पक्षात आपल्याला प्रवेश करावा लागेल.

लागू द्या. महिना लागू द्या. दोन महिने लागू द्या. पण, रणजितसिंह शिंदे यांना पहिल्यांदा विधान परिषदेचा शब्द दिल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही. आमची कार्यकर्त्यांची तुम्हाला पाया पडून विनंती आहे, असे आवाहन माजी आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर समर्थक हुबे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!