निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, सोलापुर यांची परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा निर्मित) साठ्यावर कारवाई
सोलापूर – दि. 30/12/2024 रोजी डॉ. विजय सुर्यवंशी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई सागर धोमकर विभागीय उपआयुक्त, पुणे विभाग, पुणे, यांचे आदेशानुसार व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर श्रीमती. भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक एस.आर.पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जिल्हा सोलापुर या ठिकाणी फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले मद्याचा साठा करुन विक्री होत असल्याची बातमी बातमीदाराकडून मिळालेल्या नुसार टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जिल्हा सोलापुर येथील एका घरात छापा टाकला असता घरामध्ये खाकी पुठ्यांचे बॉक्स असल्याचे दिसुन आले सदर बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री करीता प्रतिबंधीत व गोवा राज्यात विक्री साठी असणा-या विदेशी मद्याच्या बाटल्या असल्याचे दिसुन आले. त्यामध्ये रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्कीचे 50 बॉक्समध्ये 750 मिलीचे एकूण 600 बाटल्या मिळून आल्या. सदर ठिकाणाहुन आकाश धनंजय गवळी वय-26 रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापुर या आरोपीस अटक केले. त्यास अजून मद्याचा साठा कोणा-कोणास विक्री केला आहे अशी विचारणा केली असता शहाजी गायकवाड यास विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार सदर आरोपीस सोबत घेवुन त्याने सांगितले नुसार गायकवाड वस्ती, टाकळी सिकंदर ता. मोहोळ येतील शहाजी गायकवाड याच्या घरी जावुन शोध तपास केला असता त्याच्या ताब्यातुन घराशेजारील शौचालयात गोवा राज्य बनावटीचे फक्त गोवा राज्यात विक्रीसाठीचे रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्कीचे एकूण 25 बॉक्समध्ये 750 मिलीच्या 300 बाटल्या मिळुन आल्या. सदर ठिकाणी शहाजी पठाण गायकवाड वय-22 वर्षे रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापुर यास अटक करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान यातील सहभागी आरोपी अमोल गवळी हा फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे
या संपूर्ण कारवाईत गोवा राज्यात विक्रीसाठीचे रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्कीचे एकूण 75 बॉक्समध्ये 750 मिलीच्या 900 बाटल्या व मोबाईल जप्त करुन एकुण रु. 3,85,000/- चा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपीना अटक करुन अटक व फ़रार आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (е), 80, 81, 83, 90, 103 व 108 प्रमाणे रितसर गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयात आणखी काही इसमांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्याबाबतचा तपास सुरु आहे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर सदर मद्याचा अवैध साठा विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचा आरोपीचा कट उधळला असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरु राहणार आहेत.
सदर कारवाई जगन्नाथ पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, सोलापुर, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, रमेश कोलते श्रीमती. अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, सज्जन चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, अनिल पांढरे शोएब बेगमपुरे वसंत राठोड यांच्या पथकाने पार पाडली असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास निरीक्षक जगन्नाथ पाटील हे करत आहेत.