राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजितदादा पवार गटाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे यांच्या तक्रारीने जोर धरला…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजितदादा पवार गटाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे यांच्या तक्रारीने जोर धरला…

माळशिरस – भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना पक्ष कार्यालयाकडून पक्षविरोधी केलेल्या कार्यवाहीचा खुलासा मागितलेला असल्याने रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आलेली आहे तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सोलापूर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये जबाबदारी निश्चित केलेली आहे, त्यामुळे त्यांचे चेअरमन पद धोक्यात आले आहे. त्यातच आता भर म्हणून शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, अकलूज, ता. माळशिरस या संघाचे संचालक पदही धोक्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजितदादा पवार गटाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, अकलूज चे एम. एल. शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे खरेदी-विक्री संघाचे संचालक पद धोक्यात ??, आले आहे. त्यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे.

सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे कि, आ. रणजीतसिंह विजयसिंह मोहीते पाटील हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक वर्षे संचालक होते. व ५ वर्ष चेअरमन पण होते. महाराष्ट्र शासनाने ही संचालक बॉडी बरखास्त केली व प्रशासक नेमले. महाराष्ट्र सहकार कायदा १९६० कलम ८८ नुसार श्री. तोशनीवाल साहेबांनी रणजीतसिंह मोहीते-पाटील यांच्यावर ठपका ठेवला आहे व दोष सिद्ध केलेले आहेत. त्यामुळे आ.रणजितसिंह मोहीते पाटील महाराष्ट्र सहकार कायदा १९६० कलम ७३ CA (१,२,३) नुसार त्यांची अकलूज खरेदी विक्री संघातून संचालक म्हणून अपात्र होतात. त्यामुळे त्यांना संचालक म्हणून राहता कामा नये, व त्यांची ह्या पदावरून हाकलपट्टी करण्यात यावी. सोलापूर D.C.C बँकेचा ८८ चा निकाल सोबत जोडला आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

दि. २७/०१/२०२५ रोजी सुनावणी होणार आहे. आता डीसीसी बँकेची जबाबदारी निश्चित केल्याने आ. रणजितसिंह मोहिते पाटील ज्या सहकारी संस्थेवर आहेत, म्हणजेच श्री शंकर सहकारी संस्थेवर सुनावणी होणार आहे तोपर्यंतच ही खरेदी-विक्री संघाची सुनावणी सुरु झाली असल्यामुळे आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे हे सुद्धा पद धोक्यात असण्याची शक्यता सहकार क्षेत्रामध्ये वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!