श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे विकासकाम प्रगतीपथावर ; जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबसे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी !
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत मंदिर परिसरातील पुरातत्व विभागाकडून करावयाची विविध विकासात्मक कामे सुरू असून धारशिवचे जिल्हाधिकारी तथा श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओंबसे यांनी विकासकामांची पाहणी केली.
उत्तराखंड येथील मसुरीतील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनांक 30 डिसेंम्बर रोजी पुन्हा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आज प्रथमच श्रीतुळजाभवानी मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मागील महिनाभरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि संबंधीत अधिकाऱ्यांशी याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी तब्बल 2 तास मंदिर परिसराची व विकासकामांची बारकाईने पाहणी करत व विकासकामांबाबाबत तसेच सुरू असलेल्या शाकंभरी महोत्सवाबाबत मंदिर प्रशासनास सूचना दिल्या.
यावेळी मंदिराच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीमती माया माने, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिराचे सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, अमृतराव भोसले, इंतुले, महंत तुकोजीबुवा व अन्य मंदिर कर्मचारी उपस्थित होते.
विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव