श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर लातूर येथे कब-बुलबुल खरी कमाई उद्घाटन सोहळा संपन्न
.
लातूर – शहरातील श्री महात्मा बसवेश्वर प्रा.वि. येथे नुकताच खरी कमाई उद्वाटन सोहळा
संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पुरी मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा संघटक श्री. डॉ. शंकर चामे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून
करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते, यासाठी कब मास्टर व फ्लॉक लीडरने दिलेल्या सूचनेनुसार कब बुलबुल यांनी विविध खाद्यपदार्थ बनवून त्यांची मांडणी केली होती.यावेळी पालकांनी तसेच शिक्षकांनी स्टॉलला भेट देऊन पदार्थाचा आस्वाद घेतला असता, कब- बुलबुल यांच्या चेहऱ्यावर खरी कमाईचा आनंद दिसून येत होता. यावेळी विभाग प्रमुख श्री मेहत्रे.के.एच. सर यांनी प्रास्ताविक व संचलन सादर केले.ज्येष्ठ फ्लॉक लीडर सौ.साखरे मॅडम व कबमास्टर श्री देशमुख सर यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले लातूर भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा संघटक श्री.डॉ शंकर चामे सर यांनी
कब-बुलबुल यांना खरी कमाईचे उद्दिष्ट सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मु अ.सौ पुरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील कब-बुलबुल
विभाग प्रमुख कबमास्टर श्री काशिनाथ मेहत्रे सर, कबमास्टर श्री कलमे सर,कबमास्टर श्री देशमुख सर,कबमास्टर श्री उपासे सर तसेच
फ्लॉक लिडर सौ साखरे मॅडम,सौ माने मॅडम,सौ दुडिले मॅडम व सौ मुंडे मॅडम तसेच शाळेतील
शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव