विज कामगार महासंघाच्या लातूर परिमंडळ अध्यक्षपदी बडे, तर सचिवपदी रत्नपारखी
लातूर-लातूर येथे बुधवार (दि. 08)रोजी येथील कार्यालयात महाराष्ट्र विज कामगार महासंघाच्या बैठकीत नूतन पदाधिकारी निवड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
लातूर परिमंडळाच्या अध्यक्ष पदी नवनाथ बडे , सचिवपदी प्रवीण रत्नपारखी,उपाध्यक्ष पदी वाय. यु, चव्हाण, सहसचिवपदी दिनकर चाटे यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी नारायण गडगडे, प्रदेश संघटन मंत्री सुधाकर माने, बी टी चव्हाण यांच्या उपस्थितीत. ही लातूर परिमंडळ कार्यकारिणी जाहीर निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास आनंद लिमकर, विकास गाडेकर, शिवाजी दूधभाते, निलेश भिरंगे, सातय्या स्वामी,अमोल पाटील, श्याम अबाचने, विनोद कुंभार, श्रीराम मुंडे, अशोक मुंडे, पंडित केंद्रे, महादेव नागरगोजे, काका होदाडे, सुंदर अंजनवतीकर, संजय जेऊरकर, सुजाता हेंगणे, हरिदास कोळी, मोहन गुरव यांच्या सह लातूर, बीड, धाराशिव येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव