सोलापूर – रेशन प्रणालीत लाभार्थीना मिळत असलेल्या सकस धान्याची जागरूकता व्हावी या करिता अन्न दिन सप्ताह साजरा केला जातो, मागील तीन महिन्यापासून सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ओंकार पडोळे यांनी धान्य वाटपात सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक पटकावली असल्याने त्यांना वरिष्ठा कडून कौतुकास्पद थाप मिळत आहे, शिवाय ओंकार पडोळे यांच्या सक्षम कार्यशील पद्धतीमुळे हेलपाटे माराव्या लागणाऱ्या नागरिकांना आता वेळेत धान्य मिळत आहे,वेळेत आणि व्यवस्थित धान्य मिळत असल्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी मंदावल्या आहेत.महिनाभर ग्राहकांची वाट पहात,तर कधी फोन लावून वैतागलेल्या दुकानंदारानी आठवड्याभरात धान्य वाटप होत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.तर दुसरीकडे जिल्हा पुरवठा कार्यालयाचा कार्यक्षेत्र जरी मोठा असला तरी अकरा पुरवठा निरीक्षण अधिकारी,अकरा पुरवठा निरीक्षक अधिकारी,अकरा गोदामपाल y व्यतिरिक्त महसूल सहाय्यक, अशी एकंदरीत मोठे मनुष्यबळ असतानाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मागील वर्ष भरात एकदाही अन्न सप्ताह साजरा करता आला नाही. याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार असोसिएशन वारंवार विनंती करूनही सुधारणा होत नसल्याने पुरवठा उपायुक्त पुणे यांना लेखी निवेदन दिले आहे, निवेदनात दुकानदारांना धान्य वेळेत मिळत नसून अन्न सप्ताह साजरा करणाच्या धर्तीवर ग्रामीण भागातील दुकानदारांना दुकानात धान्य नसताना किंवा धान्य दुकानात पोहचून सुद्धा डाटा उपलब्ध नसतानाही संबंधितकडून मशीन लाईव्ह करण्यासाठी सूचना केल्या जातात. मात्र दुकानात धान्य नसताना किंवा इतर तांत्रिक अडचणीतही ग्राहकांना धान्य न देता फक्त पॉस मशीन वर अंगठे घेतल्यास संभ्रम निर्माण होतो.शहराप्रमाणे ग्रामीण भागातील दुकानातही धान्य वेळेत मिळावे, दुकानात धान्य पोहचताच विक्री करण्यासाठी डाटा उपलब्ध करून द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे. सोलापूर जिल्हा संघटनेने निवेदन दिल्यामुळे प्रभारी असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधिताना सूचना देऊनही १५५६ दुकानापैकी १०४० दुकानात धान्य पोहोच झाल्याचे कळते, मात्र पॉस मशीन वर डाटा उपलब्ध नसल्याने ८५४ मशीन नाममात्र चालू करूनही ४,२२,०६१ कार्ड संख्यापैकी फक्त ६०८५ लाभार्थीना धान्य वाटप करून फक्त ३ टक्के धान्य वाटप करत जिल्हा पुरवठा कार्यालयाला समाधान व्यक्त करता आला आहे. या वेळी प्रभारी असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करत संबंधितांना सक्त सूचना देत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.