नळदुर्ग – नळदुर्ग येथील प्रसिद्ध श्री खंडोबा यात्रेमध्ये वाहनचालकांना नगर परिषदेच्या ठेकेदाराकडून लुटले जात आहे. 20 रुपये कर ठरवूनही प्रत्यक्षात 50 रुपये वसूल केले जात असल्याची तक्रार वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.याशिवाय, ठेकेदाराकडून वाहनचालकांवर दमदाटी करताना, हातात दंडुके घेऊन त्यांना धमकावल्याचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकारामुळे यात्रेत येणाऱ्या भाविक आणि वाहनचालकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.नगर परिषदेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठेकेदाराच्या उच्छादावर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा यात्रेचा पवित्र माहोल खराब होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा अन्याय थांबवावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.