पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा सचिव पदी अंबादास गज्जम यांची नियुक्ती


सोलापूर (प्रतिनिधी )- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलने उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

अंबादास गज्जम हे सप्ताहिक कार्यसम्राट या वृत्तपत्राचे सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत त्यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन पदाधिकारी 2025 साठी सोलापूर जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष ,रामचंद्र सरवदे प्रदेश उपाध्यक्ष, किरण बाथम प्रदेश संघटक, गणेश जाधव प्रदेश सचिव , डॉ आशिषकुमार सुना मराठवाडा विभाग अध्यक्ष , बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष ,प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष , श्रीकृष्ण देशपांडे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमूख, प्रमोद भैस कार्याध्यक्ष , तानाजी माने संघटक , मिरझागालिब मुजावर सोलापूर जिल्हा अध्यक्ष ,राम हुंडारे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष ,संतोष म्हेत्रे जिल्हा संघटक , सादिक शेख जिल्हा कार्याध्यक्ष, अतुल भडंगे उपाध्यक्ष ,अमर पवार , कलीम शेख जिल्हा सरचिटणीस, बंडू तोडकर धाराशिव जिल्हा अध्यक्ष ,राहुल कोळी सातारा जिल्हा अध्यक्ष, विक्रम वाघमारे मोहोळ तालुका अध्यक्ष, सागर पवार पंढरपूर तालुका अध्यक्ष, दत्ताजी पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष ,सुजित सातपुते फलटण तालुका अध्यक्ष, मनोज गायकवाड सोलापूर शहर अध्यक्ष ,आन्सर तांबोळी (बी एस) कार्याध्यक्ष, राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सरचिटणीस ,अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!