मांडवे येथे मा.आ.राम सातपुते यांच्या श्रीराम निवासस्थानी होणार विशेष सन्मान
माळशिरस – सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार भाऊ गोरे हे उद्या गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी माळशिरस तालुक्यात येत असून त्यांच्या स्वागताची संपूर्ण जंगी तयारी करण्यात आली आहे. तालुक्यातील मुख्य महामार्गावरती विविध ठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहेत. तर प्रमुख गावातील कार्यकर्ते त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत.
माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच पालकमंत्री दौऱ्यावर येत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला या ठिकाणी सदिच्छा भेट देणार आहेत. पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत असणार आहेत.
असा असेल पालकमंत्री यांचा जिल्हा दौरा
