माळशिरस – महा ई सेवा केंद्रांत आलेल्या ग्राहकांना सौजन्याची वागणुक द्या ,तुमच्यामुळे शासनाची व प्रशासनाची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना अकलूजच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिल्या.यावेळी तहसिलदार सुरेश शेजुळ,निवासी नायब तहसीलदार अमोल कदम , कुलकर्णी मॅडम सह तालुक्यातील महा ई सेवा केंद्र चालक उपस्थित होते.जातीच्या दाखल्याबाबत बोलताना पांगारकर म्हणाल्या प्रस्ताव दाखल करून घेतानाच मानवी दिनाकांचा पुरावा बघुनच प्रस्ताव घ्या,सर्व पुरावे तालुक्यातील असतील त्यास रहिवास पुरावा आवश्यक नाही परंतु काही पुरावे इतर तालुक्यातील असतील त्यास रहिवास पुरावा आवश्यक आहे.चुकीचे दाखले दाखल करू नका,शासनाने ठरवून दिलेल्या आकारणी प्रमाणेच पैसे घ्या ,केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवा.अर्ज सादर करताना ग्राहकांचा मोबाईल नंबर नोंद करा .केंद्रात रेट कार्ड दर्शनी भागात लावा यासह सूचना देऊन ग्राहकांची तक्रार आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही कारवाई करणार असे स्पष्ट केले.यावेळी तहसिलदार शेजुल व कदम यांनीही सूचना दिल्या.
यावेळी महा ई सेवा केंद्राच्या वतीने कमिशन मध्ये वाढ व्हावी,केंद्र चालकाच्या मृत्यू नंतर वारसा ना केंद्र मिळावे आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी केंद्र चालक नवनाथ वळकुंदे,अविनाश चक्रे,अशोक सिदवाडकर ,प्रशांत सावंत यांच्यासह महा ई चालक उपस्थित होते.