गडचिरोली RTO च्या डोळ्यासमोर चालतात मर्यादा संपलेल्या गाड्या RTO कुंभकरणाच्या झोपेत

गडचिरोली RTO च्या डोळ्यासमोर चालतात मर्यादा संपलेल्या गाड्या RTO कुंभकरणाच्या झोपेत
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हाअंतर्गत अनेक ठिकाणी मर्यादा संपलेल्या गाड्या सर्रास रोडवर धावत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली RTO झोपेत आहेत का,त्याचावर कार्यवाही कधी होणार? दुसरीकडे ओव्हर लोड जड वाहन सर्रास पणे चौकातून भरधाव धावत असून RTO काय करत आहेत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्तित करण्यात येत आहे.


सूत्राच्या माहिती नुसार RTO ला हप्ते जात असल्याची माहिती आहे प्रती हाफ टन 3500,10 चक्का 5000 व त्या वरील जड वाहन 7000 ते 10000 रू असे हप्ते वसुली चालू असल्याची माहिती आहे अश्या हप्ते वसुली खोरांमुळे जिल्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. यांवर कोणाची वचक नसल्याने जिल्यामध्ये सर्रास जड वाहन रोडवर भरधाव गतीने धावत असल्याचे चित्र आहे त्यावर छाप कधी पडणार याची नागरिकांना प्रतीक्षा आहे
महत्वाचे असे कि गडचिरोली -धानोरा हायवे रोडवर रडाचे काम सुरु असून पार्किंग ची सुविधा नसतांना सुद्धा जड वाहन पार्किंग करून ठेवतात आणि त्या रोडाने RTO चे येणे -जाणे आहे तरीसुद्धा त्याचावर कार्यवाही होत नाही त्यामुळे असे सिद्ध होते कि तुम्हाला जे करायचे ते करा पण आम्हाला हप्ते मिळाले पाहिजे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वेक्त केला जात आहे असच चालत राहिले तर सामान्य नागरिक्काना प्रवास करणं जीवावर बितेल असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!