परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कळंब आगारातील नवीन बसेसचे लोकार्पण..!
कळंब : शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री . प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कळंब आगारात दाखल झालेले १० नव्या लालपरी बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री सरनाईक यांनी लोकांच्या मागणीनुसार कळंब ते अक्कलकोट ही नवी बससेवा सुरू करण्याची घोषणा केली.

एस. टी. महामंडळाच्या ताफ्यामध्ये यंदा पासून ५ हजार नवीन बसेस दाखल होत आहेत . पुढील पाच दरवर्षी ५ हजार बसेस याप्रमाणे २५ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीच्या सर्व जुन्या बसेस प्रवासी सेवेतून बाद होऊन त्याची जागा या नव्या कोऱ्या बसेस घेणार आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य प्रवासी जनतेला सुरक्षित व सुखकर प्रवास करणे शक्य होईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. त्यावेळी एसटीचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव