लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे रामायण पारायण मंडळ व नेवरे ग्रामस्थांचे श्रीराम भक्तांना आवाहन
माळशिरस :- माळशिरस तालुक्यातील नेवरे येथील श्री.श्रीराम मंदीर , जुनी चावडी याठिकाणी विजयादशमी, दसरा (दि.१२/१०/२०२५) पासून संत एकनाथ कृत भावार्थ रामायण कथा सुरु असून या रामायणातील अतिशय महत्त्वाच्या युध्दकाण्ड यातील भव्य दिव्य अशा लक्ष्मणशक्ती मुक्तोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे येत्या मिती फाल्गुन कृ.८ शके १९४६ शनिवार दि.२२/०३/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी माळशिरस तालुक्याबरोबर, नेवरे ,नांदोरे, कोंढारपट्टा,उंबरे (वे), गावातली तसेच पंचक्रोशीतील हजारो रामभक्त, वाचक, सूचक व भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. तरी या भव्य लक्ष्मणशक्ती मुक्तोत्सव सोहळा कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नेवरे गावातली येथील ग्रामस्थांनी यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवरे येथील श्री रामायण मंडळ व समस्त ग्रामस्थ, नेवरे व कोंढारपट्टा ता.माळशिरस, जि.सोलापूर यांच्या वतीने, एकनाथी भावार्थ रामायण पारायण ११ वे श्री. श्रीराम मंदीर जुनी चावडी याठिकाणी दि.१२/१०/२०२४ दिनापासून भावार्थ रामायण कथेस प्रारंभ झालेला असून या रामायण कथेसाठी वाचक म्हणून पंचक्रोशितील श्रीराम भक्त दैनंदिन रामायण कथेचे वाचन व विस्तृत वर्णन करत आहेत. संपूर्ण रामायणामध्ये रामायणाचे सात काण्ड असून यामध्ये बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड, युध्दकाण्ड (लक्ष्मण शक्ती), उत्तर काण्ड असे एकूण सात काण्ड आहेत. यापैकी बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड हे पूर्ण झाले आहे. आता युध्दकाण्डामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे भव्य दिव्य अशा आयोजनाची तयारी याठिकाणी सुरु झालेली आहे.

येत्या दि. २२/०३/२०२५ रोजी नेवरे परिसर मधील जि.प.प्राथमिक शाळा, नेवरे या ठिकाणी या भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी ठीक ४ वाजता ग्रंथ मिरवणूक व सायंकाळी ६ वा.या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमास ग्रंथ वाचन सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी दि.२३/०३/२०२५ रोजी सकाळी ठीक ६ वा. आरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाचक व सुचकांनी आपली नाव नोंदणी शनिवार दि.२२/०३/२०२५ रोजी रात्री ९ वा.अगोदर करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी सकाळी ६ वा.नंतर भव्य महाप्रसादाच्या पंगती सुरु होतील त्या प्रमाणे यांचा भाविकांनी लाभ घ्यावा. लक्ष्मण शक्ती सोहळ्या यांच्या अनुषंगाने नेवरे येथुन दि. ०९/०३/२०२५ रोजी या ठिकाणाहून वनवासी मंडळी यांनी १४ दिवसांच्या वनवासासाठी जाणार आहेत तरी वनवासी मंडळींना निरोप देण्यासाठी सर्व नेवरे ग्रामस्थ यांनी हजेरी लावणार आहेत त्या ठिकाणा टाळ मृदुंगाच्या गजरात संत एकनाथ कृत भावार्थ रामायण ग्रंथ ची गावातून शोभायात्रा निघणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व रामभक्त, वाचक, सूचक व भाविक भक्त यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन ग्रामस्थ व तरुण मंडळी यांनी केले आहे.