पत्रकार सुरक्षा समितीची तुळजापूर येथे बैठक आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार

पत्रकार सुरक्षा समितीची तुळजापूर येथे बैठक आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार


तुळजापूर (प्रतिनिधी ) – पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा धाराशिवची ची तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष चांद शेख होते या बैठकित

पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच पत्रकारांचे प्रश्न सुटल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्धार करण्यात आला

पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष घालावं


राज्यात पत्रकारांचे प्रश्न जटील होत असून ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची मागणी प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष यशवंत पवार यांनी केली.


पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यसरकार उदासीन का? राहुल कोळी यांचा खडा सवाल

पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकारांच्या प्रश्नावर वारंवार निवेदन देऊन देखील पत्रकारांचे प्रश्न का सोडवले जात नाहीत असा सवाल धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी यांनी उपस्थित करून सरकार उदासीन का आहे? असा प्रश्न राहुल कोळी यांनी सरकार ला केला आहे.

पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यसरकारचे लक्ष वेधणार महिला विभाग जिल्हा अध्यक्ष सारिका चुंगे

राज्यात पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आवाज उठवत असून आपण पत्रकारांच्या प्रश्नावर सरकार चे लक्ष वेधणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष महिला विभाग सारिका चुंगे यांनी सांगितले

या बैठकीला दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जिल्हा उपाध्यक्ष रुपेश डोलारे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड तुळजापूर तालुका सचिव मकबूल तांबोळी तालुका सहसचिव गणेश कांबळे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे तालुका कार्याध्यक्ष हैदर शेख सदस्य आकाश अलकुंटे संतोष दुधभाते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!